मुंबई – 2013 साली दक्षिण कोरियामध्ये हिट झालेल्या एका थ्रिलरच्या हिंदी रिमेक आर. माधवनी करणार आहे. दक्षिण कोरियातील लेखक दिग्दर्शक किम बायोंग वू यांचा हा सिनेमा आहे. यापूर्वी दक्षिण कोरियातील सिनेमांचे हिंदी रिमेक करण्याचे काम संजय गुप्ता आणि मोहित सुरी यांनी केले आहे.
आता राम माधवनी यांच्या डायरेक्शनखाली तयार होणाऱ्या या सिनेमाची कथा न्यूजवर्ल्डशी संबंधित आहे. हा एक टेरर ड्रामा आहे. एका पुलाच्या बांधकामाच्यावेळी झालेल्या अपघाताच्यावेळी मरण पावलेल्या बांधकाम मजुरांच्या मृत्यूबद्दल राष्ट्रपतींनी माफी मागावी, या मागणीसाठी एक बांधकाम मजूर एका न्यूज चॅनेलच्या मुख्य निवेदकाला ओलीस धरतो,
अशी या सिनेमाची मध्यवर्ती कल्पना आहे. मजूर आणि श्रमिक वर्गाबद्दल सरकारच्या मनात असलेली निष्काळजीपणाची भावना या सिनेमातून व्यक्त केली जाते आहे. ओलीस धरलेल्या न्यूज अँकरच्या रोलमध्ये कार्तिक आर्यन दिसणार आहे.
त्याच्याबरोबर अमृता सुभाष आणि मृणाल ठाकूर हे देखील दिसणार आहेत. आतापर्यंतच्या कार्तिक आर्यनच्या करिअरमध्ये रोमॅंटिक रोल अधिक होते. “धमाका’मध्ये प्रथमच अशा प्रकारचा आव्हानात्मक रोल कार्तिक आर्यनला करायला मिळाला आहे.