लातुर – राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याकडून दोन वर्षापासून महिलेवर जबरदस्तीने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. लातुर जिल्ह्यातील उदगीर मध्ये हा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पदाधिकाऱ्याविरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
राष्ट्रवादीचा हा पदाधिकारी मुळचा जळकोट तालुक्यातील गुत्ती येथील असून हल्ली उदगीर मध्ये वास्तव्साय आहे. या आरोपीने गेल्या दोन वर्षापासून पीडित महिलेस दाब धमकी देऊन सातत्याने बलात्कार केल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी डॅनियल जाॅन बेन यांनी दिली आहे.
पोलिसात तक्रार न करण्यासाठी या महिलेला धमकावण्यात सुद्धा आले आहे. या धमकीची ऑडिओ क्लिप सुद्धा महिलेकडे असून हा सर्व प्रकार पोलिस अधिकाऱ्यांना महिलेने ऐकविला. त्यानंतर पोलिसांनी या पदाधिकाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करून घेतला आहे. पुढिल तपास पोलिस करत आहेत.