मुंबई – बॉलिवूडची धक धक गर्ल ‘माधुरी दीक्षित’ केवळ तिच्या एक्सप्रेशननेच नाही तर तिच्या सौंदर्यानेही सर्वांना वेड लावते. माधुरी दीक्षित आपल्या लूकमुळे चर्चेत असते, आणि त्याचवेळी तिचे सौंदर्य अबाधित असल्याचं दिसून येत. या वयातही माधुरी दीक्षितच्या चेहऱ्यावरून चाहत्यांच्या नजरा हटत नाहीत. सोशल मीडियावर देखील अभिनेत्रीचे लाखो चाहते आहेत.
दरम्यान, अभिनेत्री माधुरी दीक्षित सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आलेली आहे. ते म्हणजे नुकतंच माधुरीने एक नवीन चार चाकी खरेदी केली आहे. माधुरीची ही गाडी तब्बल 3 कोटींची आहे. असे म्हटले जात आहे की माधुरीने ‘Porsche 911 Turbo S’ मॉडेल विकत घेतले आहे. सध्या सगळीकडे फक्त माधुरीच्या याच नवीन गाडीची चर्चा होताना दिसत आहे.
सोशल मीडियावर सुद्धा या गाडीचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये माधुरी दीक्षित आणि तिचे पती डॉ. नेने ही स्पोर्ट्स कार चालवताना दिसत आहेत. या गाडीच्या वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाल्यास, सिल्व्हर मॅट रंगाच्या या गाडीचा टॉप स्पीड 330 किमी प्रतितास इतका आहे. या गाडीची किंमत सुमारे 3 कोटी 8 लाख रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. अभिनेत्री माधुरी दीक्षित नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत येत असते.