पिंपरी – पिंपरी चिंचवडचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी निर्णायक भूमिका बजावली. भरीव निधीमुळेच पिंपरी चिंचवडमध्ये आज अस्तित्वात असलेले उड्डाणपूल, प्रशस्तरस्ते, उद्याने,दवाखाने, विविध सांस्कृतिक कार्यक्रम होण्यासाठी आवश्यक असलेले नाट्यगृहे, सायन्स पार्क, ऑटोक्लस्टर आहे. मात्र 2014 नंतर म्हणावी तशी प्रगती या शहराची झाली नाही, अशी खंत आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केली.
सागर मधुकर चिंचवडे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन आमदार रोहित पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते.यावेळी सागर चिंचवडे म्हणाले की, आज शहरातील स्थानिक भूमीपुत्रांना जी काही आर्थिक सुबत्ता मिळवता आली आहे त्या पाठीमागे शरद पवार यांचे मागील 30 ते 35 वर्षाचे योगदान आहे हे शहरातील प्रत्येक पक्षातील प्रत्येक कार्यकर्त्याला मान्य करावेच लागेल.
याप्रसंगी शहर अध्यक्ष तुषार कामठे, प्रदेश प्रवक्ते रविकांत वरपे, इंडिया आघाडी समन्वयक मानव कांबळे, मावळ लोकसभा निरीक्षक माधवी जोशी, राज्य डॉक्टर सेल प्रमुख डॉ. सतीश कांबळे, माजी नगरसेवक गणेश भोंडवे, नगरसेविका जनाबाई जाधव, प्रदेश युवकचे प्रशांत सकपाळ, ओबीसी सेल अध्यक्ष विशाल जाधव, माजी,महिला अध्यक्ष ज्योती निंबाळकर, संगीता जाधव, पोलीस मित्र श्री. मालुसरे, संतोष माळी, अनिल भोसले, विवेक विधाते, अशोक तनपुरे, राहुल धनवे आदी उपस्थित होते.
अॅड.निकिता चिंचवडे यांनी आभार मानले
यावेळी नवनियुक्त पदाधिकारी आशिष पांढरे, अमित तलाठी,नागेश सदावर्ते व मयूर आरसुळ या पदाधिकार्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. उद्घाटन कार्यक्रमानिमित्त आयोजित केलेल्या आधारकार्ड दुरुस्ती अभियानात 756 नागरिकांनी सहभाग नोंदविला. तर रक्तदान शिबिरात 581 नागरिकांनी रक्तदान केले.