पुणे: श्रावणी देशमुख व अव्दिक नाटेकर यांनी प्रत्येकी दोन गटांमध्ये विजेतेपद मिळविले आणि पुणे मेट्रोपॉलिटन जिल्हा टेनिस संघटना (पीएमडीटीए) आयोजित कनिष्ठ मानांकन टेनिस स्पर्धेत दुहेरी यश संपादन केले.
दिलीप वेडेपाटील स्पोर्टस अकादमी, बावधन येथील टेनिस कोर्टवर या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. 12 वर्षाखालील मुलींच्या गटात बिगर मानांकि श्रावणी देशमुखने आठव्या मानांकित साहना कमलाकन्ना हिचा 4-0, 4-1 असा धुव्वा उडविला. मुलांच्या गटात अव्वल मानांकित नाटेकरने शिवतेज श्रीफुलेचा 4-0, 4-2 असा पराभव केला. 14 वर्षाखालील मुलींच्या गटात बिगर मानांकि देशमुखने चतुरस्त्र खेळ करीत अग्रमानांकित शिरीन वाकलकरला 4-0, 4-2 असे निष्प्रभ केले व दुहेरी मुकुट पटकाविला. मुलांच्या गटात चौथ्या मानांकित नाटेकरने दुस-या मानांकित अदनान लोखंडवाला याचा 5-4(7), 4-2 असा टायब्रेकरद्वारा पराभव केला आणि आपल्या नावावर दुसरे विजेतेपद नोंदविले.
सविस्तर निकाल: अंतिम फेरी-12 वर्षाखालील मुली- श्रावणी देशमुख वि.वि साहना कमलाकन्ना 4-0, 4-1. 12 वर्षाखालील मुले-अव्दिक नाटेकर वि.वि शिवतेज श्रीफुले 4-0, 4-2. 14 वर्षाखालील मुली-श्रावणी देशमुख वि.वि शिरीन वाकलकर 4-0, 4-2. 14 वर्षाखालील मुले- अव्दिक नाटेकर वि.वि अदनान लोखंडवाला 5-4(7), 4-2.