चिंबळी -लॉकडाऊनमुळे निघोजे (ता. खेड) येथे अडकलेल्या 600 परप्रांतीय मंजुरांची बिहार व राजस्थान येथे रवानगी करण्यात आली आहे. अशी माहिती पोलीस पाटील राहुल फडके यांनी दिली. या परप्रांतीय मजुरांना गावी जाण्यासाठी निघोजे येथून पिपंरी चिंचवड महापालिकेच्या पीएमपीएमएल च्या 32 बसने पुणे स्टेशन येथे रेल्वे स्टेशनवर रवानगी करण्यात आली.
यावेळी पोलीस उपनिरीक्षक बालाजी सोनटक्के, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मधुकर पानसरे, पोलीस हवालदार सचिन सुर्यवंशी, चंद्रकांत गवारी, वैशाली भडलवाड, तलाठी बी. बी. पाटील, उपसरपंच नीलेश पवार, सदस्य जितेंद्र आल्हाट, नाना जैद आदी यावेळी उपस्थित होते.