आपली मोत्यासारखी दंतपंक्ती असावी, असं सर्वांनाच वाटतं. मात्र, यासाठी दातांची काळजीही घ्यावी लागते. एका सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की भारतीय लोक दातांच्या आरोग्याबाबतीत निष्काळजीपणा करतात. सुमारे साठ टक्के भारतीय दंतचिकित्सकांची सेवा घेण्यास टाळाटाळ करतात. आपल्या दैनंदिन जीवनात काही चांगल्या सवयी जोडून आणि काही वाईट सवयी कमी केल्यामुळे दात सहजपणे निरोगी ठेवता येतात. पाहुयात, कोणत्या सवयीमुळे दात राहतील स्वच्छ, निरोगी आणि मोत्यासारखे.
-
जास्त पाणी प्या आणि जेवणानंतर नियमित चुळ भरा. दात आणि हिरड्या स्वच्छ धुवा. यामुळे हिरड्या आणि दात यांच्यामधील अडकलेले अन्नाचे कणदेखील निघून जातात तसेच तोंडाला दुर्गंधी येत नाही.
-
आपल्या आहारात सफरचंद, काकडी, गाजर यासारख्या फळांचा समावेश करा. ते आपले दात नैसर्गिकरित्या स्वच्छ करतात आणि हिरड्याच्या समस्या देखील दूर करतात.
-
साखर मुक्त आणि दातांना चमकदार बनविणारे च्युइंगम उत्पादने देखील दात स्वच्छ ठेवण्यास मदत करतात. त्यांचा संतुलित वापर आपले पचन सुधारतो.
-
कोल्ड ड्रिंक्स घेताना स्ट्रॉ वापरा जेणेकरून आपले दात अत्यंत थंड आणि गोड पदार्थांचा थेट संपर्क टाळतील.
-
दिवसातून कमीतकमी दोनदा ब्रश करा. दिवसा काहीही खाल्ल्यानंतर तोंड स्वच्छ करा. व्हिटॅमिन सी ला अन्नाचा एक भाग बनवा. हे हिरड्या निरोगी ठेवेल.
-
कॅल्शियमयुक्त टूथपेस्ट वापरण्याऐवजी कॅल्शियम युक्त पदार्थ अधिक प्रभावी असतात आणि हे दात मजबूत बनवतात.
-
चॉकलेट आणि टॉफी शक्यतो टाळा. खायचेच असल्यास खूप कमी प्रमाणात खा. चॉकलेट संपूर्ण तोंडात विरघळते आणि दातांच्या फटीत अडकून कॅव्हिटी निर्माण करते.
-
अन्नामध्ये स्टार्चचा वापर कमी करा. हे बॅक्टेरिया तयार करते ज्यामुळे दात किडण्यासारख्या समस्या उद्भवतात.
-
अति गरम आणि अति थंड दोन्ही पदार्थांचे सेवन करणे टाळा. हे दोन्ही दातांवरील आवरण कमी करतात.
-
खूप थंड पदार्थ खाल्ल्यानंतर लगेच खूप गरम पदार्थ खाऊ नका. यामुळे दातांच्या नसामध्ये झिणझिण्या येतात. हिरड्यांमधील रक्त हे पायरियाचे लक्षण आहे. अशावेळी दंतवैद्याशी त्वरित संपर्क साधा.
-
दातांच्या सुरक्षिततेसाठी, बराच काळ काहीही ण खाणे आणि दुर्गंधीयुक्त पदार्थ न खाणे गरजेचे आहे.