ओडेन्स – भारताचा अव्वल खेळाडू किदाम्बी श्रीकांत याने जेसन ऍन्थनी याच्यावर 21-15, 21-14 अशी मात केली व स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. हा सामना श्रीकांतने केवळ 37 मिनिटांत जिंकला. जेसन हा क्रमवारीतील 33 वा मानांकित खेळाडू आहे. मात्र, या सामन्यात श्रीकांतने त्याला सामन्यात परतण्याची संधीच दिली नाही.
भारताचा अव्वल बॅडमिंटनपटू लक्ष्य सेन याचे डेन्मार्क ओपन बॅडमिंटन स्पर्धेतील पुरुष एकेरीतील आव्हान संपुष्टात आले. अर्थात, त्याने या दुसऱ्या फेरीच्या सामन्यात जी लढत दिली त्याचेच कौतुक जास्त झाले. सेनला या फेरीत डेन्मार्कच्याच हान्स क्रिस्तियन सोलबर्गकडून 21-18, 21-8 असा पराभव पत्करावा लागला. मात्र, पहिल्या गेममध्ये त्याने हान्सला चांगलीच लढत दिली.
एकवेळ दोघांनी बरोबरी केली होती. मात्र, निर्णायक क्षणी सेनचा अनुभव कमी पडला व त्याला ही गेम गवमावी लागली. दुसऱ्या गेममध्येही त्याने पहिल्या पाच गुणांमध्ये हान्सला चांगलेच हैराण केले होते. मात्र, त्याचा प्रतिकार कमी पडला व या गेमसह त्याला सामनाही गमवावा लागला.