सायकलवरील जीएसटी 5 टक्‍के करण्याची मागणी

नवी दिल्ली – सायकलवर सध्या असलेला 12 टक्‍के जीएसटी कमी करून 5 टक्‍के करण्याची मागणी सायकल उद्योगांकडून करण्यात आली आहे.

हिरो सायकल्सचे व्यवस्थापकीय संचालक पंकज मुंजाळ म्हणाले की, गरीब लोक वापरत असलेल्या सायकलवर 12 टक्‍के जीएसटी अयोग्य आहे. रस्त्याची सुधारणा केल्यानंतर सायकलचा वापर वाढेल. लॉकडाऊनच्या काळात लोकांनी सायकल वापरायला सुरुवात केली आहे. मात्र, शहरात सायकलसाठी पुरेसे रस्ते नाहीत, अशी खंत त्यांनी व्यक्‍त केली.

लॉकडाऊनच्या काळात जिमला जाण्याऐवजी सायकलने प्रवास करण्याचा कल शहरांमध्ये वाढत आहे. याचा उपयोग करून या क्षेत्राला चालना दिली तर पर्यावरणाला मदत होईल. इलेक्‍ट्रिक सायकलसाठी सरकारने मदत जाहीर करण्याची गरज आहे, असे ते म्हणाले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.