पिंपरी -हिंजवडी येथील एका वाईन शॉपचे कुलून तोडून चोरट्यांनी 60 रुपये रोख रक्कम चोरुन नेली. या प्रकणी शाम ठाकुरदास जगवानी यांनी फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सिबॅरस इमारतीत एलोरा वाईन्स नावाचे दुकान आहे.
चोरट्यांनी दुकानाचे कुलूप तोडून दुकानाच्या काउंटरमध्ये ठेवलेले 60 हजार रुपये चोरुन नेले. तसेच दुकानासमोरील सुलोचना करंजावणे यांचे घराचा दरवाजाचे लॉक तोडून चोरी करण्याचा प्रयत्न झाला. तसेच मुंबई-बंगलोर हायवे रोडवरील झिनीया सोसायटी बावधान पुणे येथील दुकान गाळ्यामधील एसपीएल या ट्रान्सपोर्टचे ऑफिसमध्येही चोरी झाल्याचे कळाले आहे.
याबाबत हिंजवडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक ए.एम. पगारे पुढील तपास करत आहेत.