बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण सोशल मीडियावर नेहमीच ऍक्टिव्ह असते. दीपिकाने नुकतेच सोशल मीडियावर दोन रोमॅन्टिक फोटो शेअर केले आहेत. विशेष म्हणजे, हे दोन फोटो एक्स बॉयफ्रेंड रणबीर कपूरसोबतचे आहेत. हे फोटो “ये जवानी है दीवानी’च्या शुटिंगच्या वेळचे आहेत. या चित्रपटाला 7 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने दीपिकाने हे फोटो शेअर केले आहेत.
दीपिका पादुकोण आणि रणबीर कपूर स्टारर चित्रपट 31 मे 2013 मध्ये रिलीज झाला होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला होता. हे फोटो शेअर करताना दीपिकाने तिची आवडती भूमिका असणाऱ्या नैना तलवारची एक लाइन लिहिली आहे.
View this post on Instagram
👩🏽🏫 @worldeconomicforum @tlllfoundation #wef20 #crystalaward2020 #crystalawards
दीपिकाने कॅप्शनमध्ये लिहिले की, आमची पहिला लुक टेस्ट. यादें मिठाई के डिब्बे की तरह होती हैं…एक बार खुला, तो सिर्फ एक टुकड़ा नहीं खा पाओगे- नैना तलवार. “ये जवानी है दीवानी’चे सात वर्ष पूर्ण.’
दीपिकाच्या या फोटोंवर रणवीर सिंहने “क्यूट’ अशी कमेंट केली आहे. त्याचबरोबर बॉलीवूड डिझाइनर मनीष मल्होत्राने हार्ट आणि स्माइली इमोजी पोस्ट करत कमेंट केली आहे.
दरम्यान, या दोघांच्या रिलेशनशिपच्या अनेक चर्चा रंगलेल्या पाहायला मिळाल्या. ब्रेकअपनंतर दीपिकाच्या आयुष्यात रणवीर सिंहने एन्ट्री घेतली आणि एकमेकांसोबत आपली लग्नगाठ बांधली.