बारामती -कोऱ्हाळे बुद्रुक (ता. बारामती) येथील करोना संक्रमित रुग्णाची 75 वर्षीय पत्नीलाही करोनाची लागण झाली आहे. त्यामुळे तालुक्यात आता करोनाबाधितांचा एकूण आकडा 20वर पोहोचला आहे.
कोऱ्हाळे बुद्रुक येथील 90 वर्षीय वृद्धास करोनाची लागण झाल्यानंतर रुग्णाच्या संपर्कातील 11 जणांची तपासणी करण्यात आली. त्यातील एक पॉझिटिव्ह तर 10 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर मनोज खोमणे यांनी दिली आहे. कोऱ्हाळे बुद्रुक गाव प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे.
गावच्या सीमा बंद करण्यात आल्या असून पाच किलोमीटरचा परिसर बफर झोन म्हणून घोषित केला आहे. अत्यावश्यक कारणाशिवाय नागरिकांनी घराबाहेर पडू नये, प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी केले आहे.