मुंबई – बेशर्म रंग या गाण्यानंतर शाहरुख खानचा पठाण सिनेमा चांगलाच चर्चेत आला होता. गाण्यातील बोल्ड सीनमुळे चित्रपट चांगलाच वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. अशात पठाणमधील दुसरं गाणं आता प्रदर्शित करण्यात आले आहे. ‘झूम जो पठाण’ या गाण्यावर शाहरुख फॅन्स देखील थिरकताना दिसत आहेत.
फॅन्सला हे गाणं चांगलाच पसंत पडत आहे. विदेशी लोकेशन त्यातच शाहरुखसह दीपिकाचा डान्स यामुळे अनेकांच्या पसंतीस हे गाणं उतरताना दिसत आहे. सोशल मीडियावर हे गाणं चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे. दीपिकाचा बोल्ड अवताराची भुरळ पुन्हा एकदा चाहत्यांना पडल्याचे दिसून येते.
अरिजीत सिंह, सुकृति आणि कुमारने हे गाणं गायल आहे. गाण्याचे शब्द कुमारने लिहिले असून विशाल शेखरने हे गाण कंपोझ केलं आहे. बॉस्को सिजरने कोरिओग्राफ केलेल्या या गाण्यावर चाहत्यांनी रिल्स देखील बनवायला सुरुवात केल्याचे दिसून येते. वाद सुरू झाल्यानंतर अनेकांनी चित्रपटाच्या बंदीची मागणी केली होती. त्यानंतर आता दुसरं गाणं देखील प्रदर्शित करण्यात आल्याचे पुन्हा एकदा पठाणची चर्चा सुरु झाली आहे.