मुंबई – अभिनेत्री दीपिका पदुकोण इंडस्ट्रीमधील टॉप हिरोईन पैकी एक आहे. त्यामुळे दीपिकाच्या ड्रेसिंगपासून ते तिच्या सोशल मीडियापर्यंतच्या सर्व गोष्टींची मीडियामध्ये जोरदार चर्चा असते. नुकतंच दीपिकाने एका इव्हेंटमध्ये आपण डिप्रेशनमध्ये गेल्याची धक्कादायक कबुली दिली.तसेच मेंटल हेल्थबाबत अस्वस्थ असताना आपल्या आईने कशाप्रकारे आपल्याला ओळखले हे देखील दीपिकाने सांगितले.
करिअरच्या चांगल्या वळणावर असताना दीपिकाने आपण प्रचंड डिप्रेशनमध्ये गेल्याचे सांगितले. दीपिका म्हणते,डिप्रेशनमध्ये का गेले हे मला माहिती नाही,परंतु मी खचून जाईल असं वाटत असल्याचे दीपिकाने यावेळी सांगितले. तसेच आपल्या अवस्थतेची माहिती केवळ आईला कळल्याचे देखील तिने सांगितले. कोणतेही कारण नसताना मानसिक हेल्थ बिघडली असल्याचे दीपिकाने यावेळी मनमोकळे पनाने सांगितले.
दीपिकाने एका मुलाखतीत सांगितले, “त्या वेळी मला फक्त झोपायचे होते कारण झोपणे हा माझ्यासाठी लपण्याचा एक मार्ग होता. त्यावेळी मला फक्त स्वतःला मारावेसे वाटत होते.असं म्हणत दीपिकाने सांगितले की, जेव्हा तिचे आई-वडील तिला भेटायला आले तेव्हा ती त्यांच्यासमोर खूप रडली. दीपिका आणि रणबीर कपूर एकेकाळी रिलेशनमध्ये होते नंतर त्यांचं प्रेकप देखील झालं. यानंतरच्या काळातच दीपिका डिप्रेशनमध्ये गेल्याच्या चर्चा मीडियासह सिनेसृष्टीत सुरु झाल्या होत्या.