मुंबई – पठाणच्या यशानंतर सोशल मीडियावर दीपिका पदुकोणची क्रेझ खूप वाढली आहे. दीपिका आणि शाहरुख हे आता बॉलिवूडमधील एक हिट समीकरण झालं आहे. त्यामुळे चाहत्यांना देखील दीपिकाच्या कामाबाबतही प्रत्येक अपडेट हवी असते. नुकतंच दीपिकाने एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. ज्यामध्ये ती नो मेकअपमध्ये दिसत आहे.
यापूर्वी दीपिका पदुकोणने हॉलिवूड अभिनेता ड्वेन जॉन्सनच्या मानसिक आरोग्याबाबत केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली होती ज्यामुळे ती चांगलीच चर्चेत आली होती. दीपिका बॉलिवूडसह हॉलिवूड चित्रपटांत देखील काम करते त्यामुळे तिचे फॅनफॉलोविंग प्रचंड आहे. अशात तिने सोशल मीडियावर केलेली छोटी कृती देखील फॅन्सच्या लक्षात येत.
यावेळी देखील असाच काही झालाय. दीपिका पदुकोणने साधा शर्ट आणि गळ्यात एक चेन असलेला तिचा नो मेकअप सेल्फी शेअर केला आहे. यासोबत पठाण अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये फक्त एक सन टाकला आहे. यावेळी अनेकांनी तिला तिच्या या सौंदर्याचे रहस्य विचारले आहे. तर एका चाहत्याने आम्ही रणवीरच्या कमेंटची वाट पाहत असल्याचे म्हंटले आहे.
View this post on Instagram
दीपिकाच्या आगामी प्रोजेक्ट बाबत बोलायचे झाल्यास ती अभिनेता प्रभास आणि अमिताभ बच्चन स्टारर एका बड्या चित्रपटात दिसणार आहे. तसेच हृतिक रोशनसोबत फायटर या एका अॅक्शन चित्रपटात देखील दीपिका मुख्य भूमिकेत दिसणार आहे.