टाकवे बुद्रुक – आंदर मावळमधील सर्वाधिक श्रीमंत गणल्या जाणाऱ्या टाकवे बुद्रुक ग्रुप ग्रामपंचायतीच्या वतीने मागील पाच वर्षांत करण्यात आलेल्या विविध विकासकामांचा लोकार्पण सोहळा शुक्रवारी (दि. 21) मावळ तालुक्याचे आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते होणार आहे.
टाकवे बुद्रुक, फळणे, बेलज या तिन्ही गावांमध्ये विकासाचा समतोल राखत पायाभूत सुविधांना अधिक प्राधान्य देण्यात आले. या वेळी स्मशानभूमी, पाईपलाईन, बंदिस्त गटारे, निवारा शेड, कॉंक्रीट रस्ते, स्ट्रीट लाईट, सी.सी.टी.व्ही. कॅमेरे, हायमास्ट दिवे, अंगणवाडी, सभामंडप, समाज मंदिरे, शाळा इमारत, जॅकवेल पाईपलाईन इत्यादी कामाचा लोकार्पण सोहळा होणार आहे.
आमदार सुनील शेळके, उपाध्यक्ष संत तुकाराम साखर कारखाना बापूसाहेब भेगडे,
मा. सभापती समाज कल्याण अतिशजी परदेशी, अध्यक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेस मावळ तालुका बबनराव भेगडे, नगरसेवक तळेगाव दाभाडे गणेश खांडगे, सभापती कृषी, पशुसंवर्धन समिती जिल्हा परिषद बाबूराव वायकर, गटविकास अधिकारी मावळ सुधीर भागवत, जिल्हा परिषद सदस्या शोभा कदम, मा. उपसभापती पंचायत समिती सदस्य शांताराम कदम, सरपंच, युवक अध्यक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस सुनील दाभाडे, नगरसेवक तळेगाव दाभाडे संदीप शेळके यांसह टाकवे बुद्रुक ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंच तसेच सर्व सदस्य उपस्थितीत राहणार आहेत.