प्रथमाचार्य १०८ श्री शांतीसागर महाराज यांना संबोधित करणारे पोस्टल तिकीट काढावे

खासदार धैर्यशील माने यांचे केंद्रीय मंत्र्यांना निवेदन

कोल्हापूर /प्रतिनिधी- श्रेष्ठ व्यक्तींची चरित्रे समाजाला स्फुरण देणारी असतात. हीच चरित्रे सामान्य माणसाच्या जीवनामध्ये मार्गदर्शक ठरतात. शांतीसागर महाराजांची पुण्यतिथी तसेच 2019-2020 हे त्यांचं दीक्षा शताब्दी वर्ष असून जैन बांधवांनी शताब्दी वर्षाचे औचित्य साधून समस्त जैन समाजातर्फे शांतीसागर महाराजांना संबोधित करणारे पोस्टल तिकीट काढावे अशी मागणी खासदार धैर्यशील माने यांनी केंद्रीय कायदा व सुव्यवस्था मंत्री मा. ना. रविशंकर प्रसादजी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

जैन समाजातील प्रथम आचार्य शांतीसागर महाराजांचं चरित्रही धर्ममूर्तीचं, पुण्यशील वृत्तीचं व सम्यक ज्ञानाच प्रतिक आहे. त्यांचं श्रेष्ठत्व समाजाला मार्गदर्शक ठरणार आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.