पुणे -बदलत्या हवामानाचा फटका सजावटीच्या फुलांना बसला आहे. एकीकडे मध्यल्या काळात झालेल्या पावसामुळे फुलांची सजावटीच्या फुलांची आवक चांगली होत आहे. तर, दुसरीकडे सजावटीच्या फुलांना उन्हाचा तडाखा बसला आहे. त्यामुळे यंदा लग्नसराईतही सजावटीच्या फुलांना कमी मागणी राहिली आहे. परिणामी नेहमीच्या तुलनेत या फुलांना पंचवीस टक्के कमी भाव मिळत आहे.
सजावटीच्या फुलांमध्ये डच गुलाब, कार्नेशियन, जर्बेरा, लिलियम, ऑर्किड आदी फुलांना मोठी मागणी असते. तर, केशरचनेसाठी जिप्सोफिला, मोगरा आदी फुलांना नागरिकांची पसंती मिळते. यंदा अधून मधून पडणाऱ्या पावसामुळे ऐन उन्हाळ्यातही फुलांच्या उत्पादनात वाढ झाली. लग्नसराईकाळात फुलांना मागणी वाढून भाव वाढतील अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती.मात्र, उन्हाचा चटका उशिरापर्यंत कायम राहत असल्याने कार्यक्रम सुरू होण्यापुर्वीच फुले सुकून जाण्याचे प्रमाणात वाढ झाली. त्यामुळे, वर-वधू पक्षासह सजावटकारांकडून खऱ्या फुलांची सजावट टाळण्यासह नकली फुलांचा वापर सुरू केला आहे.
परिणामी, ऐन लग्नसराईतही कटफ्लॉवरचे भाव मागणी अभावी पंचवीस टक्क्यांनी खाली आल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले. जिल्हातील खेड शिवापूर, शिक्रापूर, मावळ, तळेगाव दाभाडे येथून आणि दक्षिणेकडील राज्यातून सजावटीच्या फुलांची मार्केट यार्डातील फुल
दरवर्षी लग्नसराई काळात सजावटीच्या फुलांना मोठी मागणी असते. यंदा वेगळी परिस्थिती आहे. मधल्या काळात झालेल्या पावसामुळे मुबलक पाणी उपलब्ध झाल्याने फुलांच्या उत्पादनात वाढ झाली. मात्र, उन्हाचा चटक्यामुळे फुलाच्या दर्जावर परिणाम झाला आहे. परिणामी, मागणी आणि भाव कमी आहेत.
– सागर भोसले, फुलाचे व्यापारी, मार्केट यार