आळेफाटा – आळेफाटा (ता. जुन्नर) येथील स्टेट बॅंकेच्या शाखेमध्ये शनिवारी (दि. 28) विविध प्रकारातील कर्ज घेतलेल्या; परंतु थकीत असलेल्या खात्यांसाठी बॅंकेमार्फत कर्जमुक्ती होण्यासाठी व्याजात भरगोस सवलत देण्यात आली आहे.
त्यामुळे थकीत खाते निकाली लागण्यात मदत होणार आहे. बॅंकेमार्फत वन टाईम सेटलमेंटच्या योजनेमार्फत ही बुडीत कर्ज (एनपी) खाते निकाली निघणार आहे.
थकीत कर्जदारांना कर्जाची सेटलमेंट रक्कम भरल्यानंतर नो ड्युजचा दाखला देण्यात येणार असल्याची माहिती शाखा व्यवस्थापक स्मिता सालंके यांनी दिली.