शिक्रापूर -सणसवाडी (ता. शिरूर) येथे एका बियरबारसमोर हातामध्ये लोखंडी गज घेऊन दहशत माजवत बियरबारच्या साहित्यांची तोडफोड करुन बियर बारमधील काही रक्कम काढून नेल्याची घटना घडली.
याबाबत शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे विजय नारायण दरेकर व त्याच्या दोन साथीदारांवर दरोड्यांसह आदी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याबाबत संतोष मारुती दरेकर (वय 38, रा. मारुती मंदिर शेजारी सणसवाडी ता. शिरूर) यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली.
शिक्रापूर पोलिसांनी विजय नारायण दरेकर (रा. कोरेगाव भीमा ता. शिरूर) तसेच त्याचा साथीदार वैभव व एक अनोळखी युवक (दोघांचे पूर्ण नाव पत्ते माहित नाही) यांच्या विरुद्ध दरोड्यांसह अन्य गुन्हे दाखल केले आहेत. तपास सहायक पोलीस निरीक्षक नितीन अतकरे करीत आहेत. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.