सातारा -जिल्ह्यात गेल्या 24 तासांत करोनामुळे 11 रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी शनिवारी दिली. आरोग्य विभागाने गुरुवारी रात्री जाहीर केलेल्या अहवालानुसार त्या दिवशी करोनाबळींची संख्या पाच होती. त्यात दुपटीने वाढ झाल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. जिल्ह्यातील मृतांची संख्या 1603 झाली आहे.
सातारा येथील क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयात उपचार घेतलेल्या सुलतानपूर, ता. वाई येथील 71 वर्षीय पुरुष, आदित्यनगरी, ता. सातारा येथील 62 वर्षीय पुरुष, जिल्ह्यातील खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेतलेल्या साखरवाडी, ता. फलटण येथील 78 वर्षीय् पुरुष, पाटणमधील 76 वर्षीय पुरुष, खेड, ता. सातारा येथील 73 वर्षीय पुरुष, प्रतापगंज पेठ, सातारा येथील 74 वर्षीय पुरुष, साठेवाडी, ता. कोरेगाव येथील 74 वर्षीय पुरुष, करंजे पेठ, सातारा येथील 74 वर्षीय पुरुष, सोमवार पेठ, सातारा येथील 62 वर्षीय पुरुष, जकात नाका, करंजे (सातारा) येथील 82 वर्षीय पुरुष, गुरुवार पेठ, सातारा येथील 65 वर्षीय पुरुष, अशा 11 बाधितांचा मृत्यू झाला.