पुणे – इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून पडल्याने एक वर्षाच्या चिमुकलीचा गुरुवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना सिंहगड रोड परिसरातील नऱ्हे येते बुधवारी (दि.30) सायंकाळी साडेसातच्या सुमारास घडली. वाढदिवसाच्या दिवशीच हा प्रकार घडल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जाते आहे.
मुलीचा वाढदिवस असल्याने तीची आई इमारतीत निमंत्रण द्यायला गेली होती तर वडिल आंघोळ करत होते. अवधिका एकटीच गॅलरीत खेळत होती. खेळता खेळता ती खाली पडल्याने नागरिकांनी पाहिले. त्यांनी तीला तातडीने उचलून रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान तीचा मृत्यू झाला.
सिंहगड रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकिशोर शेळके यांनी दिलेल्या माहितीनुसार, अवधिका गाधाडे ( 1 वर्षे, रा. नऱ्हे) असे मृत चिमुकलीचे नाव आहे. इमारतीवरून पडल्यानंतर तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. पुढील तपास पोलीस करत आहेत.