गायरान जमिनीसाठी वाघोली ग्रामपंचायतीचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र

ग्रामपंचायत सदस्य जयप्रकाश सातव यांची माहिती

वाघोली (पुणे) – येथील ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच वसुंधरा उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली वॉर्ड क्रमांक तीन, चार, पाच मधील सांडपाण्याचा प्रश्‍न सोडवण्यात येत आहे. याबाबत ग्रामपंचायतीने एसटीपी प्लॅन्टसाठी गट नंबर 1419 मध्ये 20 आर गायरानक्षेत्र मिळण्याबाबत जिल्हाधिकारी यांना पत्राद्वारे जागेची मागणी करण्यात आली आहे, अशी माहिती ग्रामपंचायत सदस्य जयप्रकाश सातव यांनी दिली.

याबाबत जयप्रकाश सातव यांनी सांगितले की, वाघोली कार्यक्षेत्रामध्ये नागरी वस्ती मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे बंदिस्त गटार करुन गावालगतच्या नाल्यामध्ये सोडली आहे. ते सांडपाणी नदीला जात आहे. तसेच या सांडपाण्यामुळे परिसर दुषित होत आहे.

यासाठी ग्रामपंचायत वॉर्ड क्र. 3, 4 व वॉर्ड 5 मधील काही भागातून येणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करणे आवश्‍यक आहे. याबाबत एसटीपी प्लॅन्ट मिळण्यासाठी ग्रामपंचायतीच्या कार्यकारी मंडळाने जिल्हाधिकाऱ्यांकडे जागेसाठी मागणी केली असून याचा पाठपुरावा ग्रामपंचायत करीत आहे. वॉर्ड क्रमांक तीन, चार व पाचमधील सांडपाण्याचा प्रश्‍न सध्या गंभीर बनला आहे, हा प्रश्‍न सोडवण्यासाठी ग्रामपंचायतीने त्वरित पावले उचलली आहेत. जागेची उपलब्धता झाल्यानंतर ग्रामपंचायत पुढील नियोजन तातडीने करू शकेल आणि नागरिकांच्या प्रश्‍नांची सोडवणूक करेल, असा विश्‍वास ग्रामपंचायत सदस्य जयप्रकाश सातव यांनी व्यक्‍त केला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.