IPL 2024, Live Cricket Score (DC vs SRH Match 35) : आज आयपीएल 2024 च्या 35व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा सामना सनरायझर्स हैदराबादशी होत आहे. दोन्ही संघांमधील हा सामना अरुण जेटली स्टेडियमवर खेळवला जात आहे. या सामन्यात चांगली कामगिरी करून गुणतालिकेत आपले स्थान मजबूत करण्याकडे दिल्ली आणि हैदराबादचे लक्ष असेल. सामन्यास संध्याकाळी 7.30 वाजता सुरूवात होईल.
तत्पूर्वी, झालेला नाणेफेकीचा ( Toss ) कौल हा दिल्ली कॅपिटल्स संघाच्या बाजूनं लागला आहे. दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंतने सनरायझर्स हैदराबादविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. ( Delhi Capitals win the toss and elect to field against Sunrisers Hyderabad ) त्यामुळे टाॅस हरल्यानंतर आता हैदराबादचा संघ प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरेल. दिल्लीने या सामन्यासाठी प्लेइंग-11 मध्ये दोन बदल केले आहेत. सुमित आणि इशांत शर्माच्या जागी ललित आणि एनरिक नोर्टजे यांचा संघात समावेश करण्यात आला आहे. या सामन्यासाठी सनरायझर्स हैदराबादने संघात कोणताही बदल केलेला नाही.
DC vs SRH :दोन्ही संघाची प्लेइंग-11 खालीलप्रमाणे….
सनरायझर्स हैदराबाद : अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अब्दुल समद, नितीश रेड्डी, पॅट कमिन्स (कर्णधार), भुवनेश्वर कुमार, मयंक मार्कंडे, टी. नटराजन.
इम्पॅक्ट सब : उमरान मलिक, अनमोलप्रीत सिंग, आकाश महाराज सिंग, ग्लेन फिलिप्स, वॉशिंग्टन सुंदर.
दिल्ली कॅपिटल्स : डेव्हिड वॉर्नर, जॅक फ्रेझर मॅकगर्क, अभिषेक पोरेल, ऋषभ पंत (कर्णधार आणि यष्टिरक्षक), ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल, ललित यादव, कुलदीप यादव, ॲनरिक नॉर्टजे, खलील अहमद, मुकेश कुमार.
इम्पॅक्ट सब : पृथ्वी शॉ, शाई होप, प्रवीण दुबे, रशीख दार सलाम, सुमित कुमार.
दरम्यान, ऋषभ पंतच्या नेतृत्वाखालील दिल्ली कॅपिटल्सने आयपीएल 2024 मध्ये 7 पैकी 3 सामने जिंकले आहेत, तर 4 सामने गमावले आहेत. ते 6 गुणांसह गुणतालिकेत सहाव्या स्थानावर आहेत. दुसरीकडे, सनरायझर्स हैदराबादने 6 पैकी 4 सामने जिंकले आहेत आणि 2 सामने गमावले आहेत. पॅट कमिन्सचा संघ 8 गुणांसह गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहे.
आयपीएलमध्ये आतापर्यंत 23 सामन्यांमध्ये दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबाद आमनेसामने आले आहेत. दरम्यान, दिल्ली कॅपिटल्स (DC) ने 11 सामने जिंकले आहेत, तर सनरायझर्स हैदराबाद (SRH) ने 12 सामन्यात विजयाची चव चाखली आहे. तसेच आयपीएलच्या इतिहासात दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर एकूण 85 सामने खेळले गेले आहेत. यापैकी 38 सामने प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने आणि 46 दुसऱ्या सामन्यात फलंदाजी करणाऱ्या संघाने जिंकले आहेत तर एका सामन्याचा निकाल लागला नाही.