आळंदी – येथील दाभाडे वस्ती येथील ग्रामस्थांच्या वतीने दत्तजयंती सप्ताह दाभाडे वस्ती चऱ्होली बुद्रुक येथे हरिनाम गजरात सुरू आहे. या सप्ताहात ह.भ.प. प्रसाद महाराज माटे यांची कीर्तन सेवा हरिनाम गजरात झाली.
यावेळी माटे महाराज यांनी हृदयस्पर्शी कीर्तन सेवा रुजू केली. या प्रसंगी वारकरी महामंडळ पुणे जिल्हा अध्यक्ष ह.भ.प. सतीश महाराज काळजे, सचिन दाभाडे, बाळासाहेब तापकीर, बाळासाहेब दाभाडे, ह.भ.प. दाभाडे महाराज यांसह मान्यवर उपस्थित होते. यावेळी साथसंगत ह.भ.प. ज्ञानेश्वर वाघमोडे महाराज, ह.भ.प. गोरक्ष महाराज दांडे, ह.भ.प. काकडे महाराज, ह.भ.प. कोळकर महाराज संस्थेतील विद्यार्थी आदींनी साथ दिली.