कंगना राणावतचा “धाकड’ केव्हापासून रिलीजसाठी तयार झाला आहे. पुढच्यावर्षी 8 एप्रिलला हा सिनेमा रिलीज होणार हे निश्चित झाले होते.
मात्र, आता ही रिलीज डेट बदलली जाणार आहे. आमिर खानचा “लालसिंग चढ्ढा’ आणि यश चोप्रांच्या “केजीएफ चॅप्टर 2′ बरोबर टक्कर व्हायला नको म्हणून ही रिलीज डेट बदलली जाणार आहे, असे समजते आहे. हे दोन्ही सिनेमे बिग बजेट आणि बिग बॅनर असणार आहेत.
त्यामुळे बॉक्स ऑफिसवर एकदम अनेक पर्याय प्रेक्षकांसमोर यायला नको म्हणून “धाकड’ लगेचच पुढच्या आठवड्यात किंवा मे महिन्यात “धाकड’ रिलीज केला जाणार आहे. “धाकड’मध्ये कंगना प्रथमच गुप्तहेराच्या रोलमध्ये दिसणार आहे.
बालकांची तस्करी आणि महिलांचे शोषण करणारे रॅकेट शोधून काढून त्याचा पर्दाफोश करण्याची जबाबदारी तिच्यावर असणार आहे. “धाकड’चे शूटिंग भोपाळ, बुडापेस्ट आणि मुंबईमध्ये झाले आहे. एवढा महत्त्वाचा विषय असलेला सिनेमा ओटीटीवर रिलीज केला जाऊ नये. तो थिएटरमध्येच रिलीज केला जावा असा आग्रह कंगनाने प्रथमपासून धरला होता. म्हणूनच रिलीज डेट बदलण्याची नामुष्की आली आहे.