कुडाळ : स्टुडंट्स ऑलिंपिक असोसिएशनच्या अंतर्गत सोलापूर येथे झालेल्या राज्यस्तरीय ऍथलेटिक स्पर्धेत आसनी ता जावळी येथील सुवर्णकन्या एक्सप्रेस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कु .कादंबरी मोहन शेलार हिने सुवर्णपदक मिळवत,तालुक्याच्या शिरपेचात एक मानाचा तुरा खोवला.तिच्या या यशामुळे जावळीचे राज्यस्तरावर पडली सुवर्ण पाऊले पडले आहे.
कादंबरी ने तालुका आणि जिल्हा स्तरावर मिळालेल्या सुवर्णपदकांची पुनरावृत्ती करत आता तिने हे राज्यस्तरीय यश मिळवले आहे. “सुवर्णकन्या एक्सप्रेस” कादंबरी शेलार ने १० वर्षीय वयोगटात १०० मी ,२०० मीटर धावण्यात सुवर्णपदक पटकविले तसेच ४०० मीटर धावण्यात कांस्यपदक पटकाविले.आता तिचे ध्येय राष्ट्रीय स्तरावरील यश मिळवणे आहे.तिच्या या यशाबद्दल तिचे हडपसर पुणे येथे आगमन झाल्यावर मेढा विभागातील हडपसर येथील कार्यकर्त्यानी तिचे शाल श्रीफल आणी पुष्प गुच्छ देवुन जोरदार स्वागत केले यावेळी एकनाथ सपकाळ,दिलीप सपकाळ,सागर पार्टे,किरण शेलार,धिरज़ शेलार,मोहन जाधव,गणेश सपकाळ,जयेश सपकाळ,अमर सपकाळ आदीं उपस्थित होते.