मुंबई – अभिनेता ‘शाहिद कपूर’ नेहमीच आपल्या रोलमध्ये शिरून त्या भूमिकेला न्याय देत असतो. त्याने साकारलेल्या रोलबद्दल त्याला नेहमीच प्रेक्षकांची दाद मिळाली आहे. आता आगामी ‘जर्सी’तील क्रिकेटपटूच्या रोलसाठीही त्याने अशीच मेहनत घेतली आहे. या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाले असून लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
सिनेरसिकांचे सर्व लक्ष या चित्रपटाकडे लागले आहे. त्यात पुन्हा एकदा चित्रपट प्रदर्शित होता-होता आता लांबणीवर ढकलला गेलाय यामुळे चाहते नाराज होणार यात शंकाच नाही. शाहिदचा हा स्पोर्ट ड्रामा येत्या 14 एप्रिलला प्रदर्शित होणार होता. परंतु आता जर्सी चित्रपट 22 एप्रिल 2022 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे चाहते काहीसे नाराज झाले आहेत.
View this post on Instagram
‘जर्सी’च्या निर्मात्यांनी बॉक्सऑफिसवर ‘KGF: Chapter 2’ सोबत टक्कर होऊ नये आणि कुणाचचं नुकसान होऊ नये म्हणून चित्रपटाचं प्रदर्शन पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. ‘KGF: chapter 2’ चित्रपटात साऊथ स्टार यश, संजय दत्त, रविना टंडन, श्रीनिधी शेट्टी, प्रकाश राज असे कलाकार आहेत. तर ‘जर्सी’ मध्ये शाहिद कपूरसोबत मृणाल ठाकूर,पंकज कपूर देखील महत्त्वाची व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहेत.