मुंबई – बॉलिवूड अभिनेता वरुण धवन पहिल्यांदाच जान्हवी कपूरसोबत मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. दोघेही साजिद नाडियादवालाच्या ‘बावल’ या चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. लखनौमध्ये चित्रपटाचे शूटिंगही सुरू झाले आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेते नितीश तिवारी या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत.
नाडियादवालायांनी त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर चित्रपटाची शूटिंग सुरु झाल्याची माहिती दिली आहे. त्यांनी चित्रपटाच्या क्लिपबोर्डचा फोटो शेअर केला आहे, ज्यावर शुभ मुहूर्त असे लिहिले आहे. 10 एप्रिलपासून लखनऊमध्ये चित्रपटाचे शूटिंग सुरू झाले आहे.
वरुण धवननेही चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली होती. अभिनेत्याने त्याच्या इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करून पुढील वर्षी 7 एप्रिलला हा चित्रपट प्रदर्शित होत असल्याची माहिती दिली. जान्हवी आणि वरुणची प्रेमकथा या चित्रपटात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. चाहत्यांनाही या चित्रपटाची प्रचंड उत्सुकता आहे.
वरुण धवनच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर तो कियारा अडवाणीसोबत ‘जुग जुग जियो’ चित्रपटात आणि क्रिती सेननसोबत ‘भेडिया’ चित्रपटात दिसणार आहे. त्याचबरोबर जान्हवी कपूर ‘तख्त’ आणि ‘गुड लक जेरी’मध्ये दिसणार आहे.