पुणे – फोर्ब्स मार्शल समूहाचे संस्थापक दरायस फोर्ब्स यांचे वयाच्या 97 व्या वर्षी निधन झाले आहे. फोर्ब्स यांनी सेंटर फॉर अॅडव्हान्समेंट ऑफ फिलॉन्थॉफ्री या संस्थेच्या स्थापनेत त्यांनी मोलाची कामगिरी केली आहे. सेंटर फॉर अॅडव्हान्समेंट ऑफ फिलॉन्थॉफ्री या संस्थेचे ते संस्थापक होते.
दरायस फोर्ब्स यांचा जीवप्रवास –
फोर्ब्स यांनी 19 व्या वर्षी जे. एन. मार्शल या कंपनीत काम सुरू केले होते. त्यानंतर त्यांनी व्यवसायामध्ये मोठे यश संपादन केले. ते पुण्यातील के.ई.एम.हॉस्पिटलचे 4 वर्ष अध्यक्ष होते. याशिवाय त्यांनी दस्तुर हायस्कूलचे माजी अध्यक्ष म्हणूनही कामकाज पाहिले आहे. त्यांनी अनेक संस्थांना विना प्रसिद्धी आर्थिक सहाय्य केले आहे. त्यांच्या मागे दोन मुले, मुलगी, सून असा परिवार आहे.