सातारा -चितळी (ता.खटाव) येथे गेल्या महिन्यात युवकाला अडवून त्याचे अपहरण करत त्याच्याकडून मोबाइल, लॅपटॉप, टॅब चोरत त्याद्वारे 80 हजार डॉलरवर (भारतीय चलनानुसार 64 लाख रुपये) सायबर दरोडा टाकणाऱ्या नऊ जणांच्या टोळीचा सातारा पोलिसांनी पर्दाफाश केला. दरोडा व सायबरच्या गुन्ह्याची उकल स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने (एलसीबी) केली आहे.
किरण गुलाब गावीत (वय 32, रा. विद्यानगर, कराड), बिरजू उर्फ सतीश विलास रजपूत उर्फ कांबळे (वय 38, रा. शांतीनगर, इचलकरंजी), विशाल उर्फ सागर हरीभाऊ ननावरे उर्फ गुरव (वय 29, रा. सोमंथळी ता. फलटण), दुशांत मनोहर पांढरपट्टे (वय 31, रा. निपाणी जि. बेळगाव, कर्नाटक),
अभिजीत सुरेश खंडागळे (वय 35, रा. राधानगरी, जि. कोल्हापूर सध्या रा.निपाणी), प्रवीण बाळासो शेवाळे (वय 26, रा. घोगाव, ता. कराड), बाळू तुकाराम भोसले (वय 31, रा. दुर्गामाता चौक, इचलकरंजी), किशोर अंबादास निलंगे (वय 27, रा. शहापूर, इचलकरंजी),
एसपींकडून पथकाला 35 हजारांचे बक्षीस
एलसीबीने घेतलेल्या परिश्रमाचे पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी कौतुक करत तपास पथकाला 35 हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले. त्यांच्यासह अप्पर पोलिस अधीक्षक अजित बोऱ्हाडे, पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे,
फौजदार गणेश वाघ, सहाय्यक फौजदार उत्तम दबडे, तानाजी माने, हवालदार संजय शिर्के, विजय कांबळे, संतोष पवार, संतोष सपकाळ, शरद बेबले, प्रवीण फडतरे, मंगेश महाडिक, अर्जुन शिरतोडे, निलेश काटकर, मुनीर मुल्ला, गणेश कापरे, वैभव सावंत, केतन शिंदे, रोहित निकम, स्वप्नील दौंड यांनी कारवाईत सहभाग घेतला.