बर्मिंगहॅम – भारतीय बॉक्सर लोव्हलिना बोर्गोहेनने (70 किलो) राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत महिलांच्या 70 किलो वजनी गटाच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. लोव्हलिनाने एरियाना निकोल्सनविरुद्ध 5-0 असा सहज विजय मिळवला.
तसेच मोहम्मद हुसामुद्दीन याने पुरुषांच्या फेदरवेट गटात दक्षिण आफ्रिकेच्या ऍमझोले ड्याईचा 5-0 अस समान फरकाने पराभव करून उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.
INTO THE QUARTERFINALS! 👊
What a perfect start for the Tokyo Olympics Medalists @LovlinaBorgohai, as she packs 🇳🇿’s N.Ariane in some style. 🚀🚀@AjaySingh_SG | @debojo_m #Commonwealthgames#B2022#PunchMeinHainDum 2.0 pic.twitter.com/ObK4qSCJja
— Boxing Federation (@BFI_official) July 30, 2022
ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या लोव्हलिनाने सामन्यात वर्चस्व राखत न्यूझीलंडच्या एरियाना निकोल्सनला एकतर्फी पराभूत केले. गोल्ड कोस्ट आवृत्तीत पहिल्या फेरीत बाद झालेल्या लोव्हलिनाने सुरूवातीपासूनच प्रतिस्पर्धीवर हल्ला केला. आता उपांत्यपूर्व फेरीत लोव्हलिनाचा सामना वेल्सच्या रोझी एक्लेसशी होणार आहे.