बर्मिंगहॅम – राष्ट्रकुल स्पर्धेतील पहिल्या दिवशी मनिका बत्राच्या नेतृत्त्वाखालील भारतीय टेबल टेनिस संघाने दमदार कामगिरीने सुरुवात केली. या स्पर्धेच्या महिला दुहेरीत भारतीय जोडी रिथ टेनिसन आणि श्रीजा अकुलाने दक्षिण आफ्रिकेच्या लैला एडवर्डस आणि दानिशा पटेलला पराभूत करत वियजी प्रारंभ केला.
महिला दुहेरी टेबल टेनिस स्पर्धेत श्रीजा अकुला आणि रीथ टेनिसनने दक्षिण आफ्रिकेच्या लैला एडवर्डस आणि दानिशा पटेल या जोडीचा 3-0 (11-7, 11-7, 11-5) असा पराभव केला.
याशिवाय अकुलाने पुनरागमन करत दुसऱ्या एकेरीत पटेलवर 11-5, 11-3, 11-6 असा वर्चस्व राखून भारतासाठी बरोबरी साधली. आता भारतीय महिला दुसऱ्या गटात फिजीशी लढतील.
#TableTennis Update 🚨
Women’s Team- Group Stage Round 1️⃣
India 🇮🇳 3️⃣-0️⃣ South Africa 🇿🇦
🔹Reeth Rishya/Sreeja Akula (WD) – 1-0
🔹Manika Batra (singles) – 2-0
🔹Sreeja Akula (singles) – 3-0⬆️ Next
Round 2️⃣: India vs Fiji (8:30 pm IST)#Cheer4India #India4CWG2022
— SAI Media (@Media_SAI) July 29, 2022
मनिका बत्राचा एकतर्फी विजय
टेबल टेनिसच्या महिला एकेरीच्या पहिल्या फेरीत मनिका बत्राने मुशफिकुह कलामचा 11-5 अशा फरकाने पराभव केला. या सामन्यातील पहिल्या सेटमध्ये मनिका बत्राने प्रतिस्पर्धी मुशफिकुह कलामवर पूर्णपणे वर्चस्व गाजवले. त्यानंतर दुसऱ्या सेटमध्येही आक्रमक खेळी करत मुशफिकुह कलामला पुनरागमन करण्याची संधी दिली नाही. ज्यामुळे दुसरा सेटही तिने एकतर्फी जिंकला. या उत्कृष्ट कामगिरीसह तिने छाप आपली सोडली असून भारताला तिच्याकडून पदकाची अपेक्षा आहे.