ICC ODI World Cup 2023 South Africa vs Bangladesh Live Score : एकदिवसीय विश्वचषक 2023 च्या 23व्या सामन्यात आज दक्षिण आफ्रिकेचा सामना बांगलादेशशी होत आहे. आफ्रिकेचा संघ सध्या गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे, तर बांगलादेशचा संघ सातव्या स्थानावर आहे. बांगलादेश संघ हा सामना जिंकून गुणतालिकेत आपले स्थान सुधारू इच्छितो, तर दक्षिण आफ्रिका संघ उपांत्य फेरीतील आपला दावा मजबूत करू इच्छितो. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडन मार्करामने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
शेवटचे वृत्त हाती आलं तेव्हा 22 षटकांनंतर दक्षिण आफ्रिकेने 2 गडी गमावून 113 धावा केल्या आहेत. सध्या क्विंटन डी कॉक 63 चेंडूत 68 धावा करून क्रीजवर आहे आणि एडन मार्कराम 31 धावा करून क्रीजवर आहे. दोघांमध्ये 70 हून अधिक धावांची भागीदारी झाली आहे.
SA vs BAN Live : डी कॉकचे अर्धशतक…
क्विंटन डी कॉकने 47 चेंडूत अर्धशतक झळकावले. हे त्याचे एकदिवसीय कारकिर्दीतील 31 वे अर्धशतक होते. या विश्वचषकात डी कॉक जबरदस्त फॉर्मात आहे. त्याने दोन शतकेही झळकावली आहेत.
SA vs BAN Live: दक्षिण आफ्रिकेला दुसरा धक्का
दक्षिण आफ्रिकेला आठव्या षटकात 36 धावांवर दुसरा धक्का बसला. मेहदी हसन मिराझने रॅसी व्हॅन डर डुसेनला एलबीडब्ल्यू आऊट केले. त्याला एक केवळ धाव करता आली.
SA vs BAN Live : दक्षिण आफ्रिकेला पहिला धक्का
दक्षिण आफ्रिकेला पहिला धक्का सातव्या षटकात 33 धावांवर बसला. शरीफुल इस्लामने रीझा हेंड्रिक्सला क्लीन बोल्ड केले. त्याला 19 चेंडूत 12 धावा करता आल्या.
SA vs BAN : दक्षिण आफ्रिकेनं टाॅस जिंकला…
दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आजही टेंबा बावुमा खेळत नाही. त्याच्या जागी एडन मार्कराम कर्णधार आहे. आफ्रिकन संघात एक बदल झाला आहे. दुखापतीमुळे लुंगी एनगीटी खेळत नाहीये. त्याच्या जागी लिझार्ड विल्यमसनचा प्लेइंग-11 मध्ये समावेश करण्यात आला आहे. त्याचवेळी नियमित कर्णधार शकीब अल हसनचे बांगलादेश संघात पुनरागमन झाले आहे. तौहीद हृदय हा सामना खेळत नाही.
Toss news from Mumbai 📰
Aiden Markram wins the toss and South Africa will bat first 🏏
Bangladesh are boosted by the return of Shakib Al Hasan to their setup 👊#CWC23 | #SAvBAN 📝: https://t.co/seit5fwzN6 pic.twitter.com/wLDURLMLwT
— ICC (@ICC) October 24, 2023
SA vs BAN : दोन्ही संघाचं Playing 11 खालीलप्रमाणे…
बांगलादेश : तनजीद हसन, लिटन दास, नझमुल हुसेन शांतो, शकीब अल हसन (कर्णधार), मेहदी हसन मिराज, मुशफिकुर रहीम (विकेटकीपर), महमुदुल्लाह, नसुम अहमद, मुस्तफिजुर रहमान, शोरीफुल इस्लाम, हसन महमूद.
दक्षिण आफ्रिका : क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), रीझा हेंड्रिक्स, रॅसी व्हॅन डर ड्युसेन, एडन मार्कराम (कर्णधार), हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, मार्को जॅन्सन, जेराल्ड कोएत्झी, केशव महाराज, कागिसो रबाडा, लिझार्ड विल्यम्स.