ICC ODI World Cup 2023, New Zealand vs Netherlands :- विल यंगसह अन्य फलंदाजांच्या भरीव कामगिरीनंतर मिचेल सॅंटनर व मॅट हेनरी यांनी केलेल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर न्यूझीलंडने सोमवारी नेदरलॅंड्सचा 99 धावांनी पराभव केला. यासह एकदिवसीय सामन्यांच्या विश्वकरंडक स्पर्धेत न्यूझीलंडचा हा सलग दुसरा विजय ठरला. न्यूझीलंडने पहिल्याच सामन्यात इंग्लंडचा पराभव केला होता. गुणतालिकेत त्याचे (New Zealand consolidate their top position in the #CWC23 points table with another win) आता दोन सामन्यांतून चार गुण झाले असून ते पहिल्या स्थानावर कायम आहे. दुसरीकडे, नेदरलँड्स संघाचा हा सलग दुसरा पराभव आहे. हैदराबादमध्येच गेल्या सामन्यात पाकिस्तानने त्यांचा पराभव केला होता.
हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर नेदरलँडचा कर्णधार स्कॉट एडवर्ड्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. न्यूझीलंडने 50 षटकांत सात विकेट गमावून 322 धावा केल्या. प्रत्युत्तरात नेदरलँडचा संघ 46.3 षटकांत सर्वबाद 223 धावांवर आटोपला.
नेदरलँड्सकडून कॉलिन ऍकरमनने सर्वाधिक 69 धावा केल्या. स्कॉट एडवर्ड्सने 30 आणि सायब्रँड एंजेलब्रेक्टने 29 धावांची खेळी केली. न्यूझीलंडचा अनुभवी फिरकी गोलंदाज मिचेल सँटनरने पाच बळी घेतले तर मॅट हेन्री यानं तीन विकेट घेतल्या. रचिन रवींद्रने एक विकेट घेतली. पाच विकेट घेणाऱ्या सँटनरला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले.
New Zealand consolidate their top position in the #CWC23 points table with another win 🎉#NZvNED 📝: https://t.co/PxA814nbPV pic.twitter.com/ox4OM2wvvL
— ICC (@ICC) October 9, 2023
याआधी न्यूझीलंडकडून तीन फलंदाजांनी अर्धशतके झळकावली. विल यंगने 70, टॉम लॅथमने 53 आणि रचिन रवींद्रने 51 धावा केल्या. डेरिच मिशेलने 48 धावांचे, मिचेल सँटनरने नाबाद 36 आणि डेव्हन कॉनवेने 32 धावांचे योगदान दिले. मॅट हेन्री 10 धावा करून नाबाद राहिला. मार्क चॅपमनने पाच आणि ग्लेन फिलिप्सने चार धावा केल्या. नेदरलँड्सकडून आर्यन दत्त, पॉल व्हॅन मीकरेन आणि रीलोफ व्हॅन डर मर्वे यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. बास डी लीडे यानं एक विकेट घेतली.