World Cup 2023 BAN vs NED Match Live Score Updates : विश्वचषकाच्या 28व्या सामन्यात बांगलादेशसमोर नेदरलँड्सचे आव्हान आहे. दोन्ही संघांमधील हा सामना कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर खेळला जात आहे. कोलकातामध्ये खेळल्या जाणार्या या विश्वचषकातील हा पहिलाच सामना आहे. नेदरलँड्स चा कर्णधार स्कॉट एडवर्ड्सने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. त्यानंतर नेदरलँड्सचा संघ 50 षटकांत सर्वबाद 229 धावसंख्येपर्यतच मजल मारू शकला. आता बांगलादेशला विजयासाठी 230 धावा करायच्या आहेत.
हा सामना गमावणारा संघ विश्वचषकातील उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडेल. बांगलादेश आणि नेदरलँड्ससाठी उपांत्य फेरी गाठण्याचे दरवाजे जवळपास बंद झाले आहेत. आता अंतिम चारमध्ये प्रवेश करण्यासाठी दोन्ही संघांना प्रत्येक सामना जिंकावा लागेल. यासोबतच दोन्ही संघांना इतर संघांच्या निकालावरही अवलंबून राहावे लागणार आहे.
NED vs BAN Live Score : शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा, 230 धावांचा पाठलाग करताना बांगलादेशच्या 15 षटकात 3 बाद 55 धावा झालेल्या आहेत. त्यांना विजयासाठी आणखी धावांची आवश्यकता असून सध्या क्रीजवर . मेहदी हसन मिराज 30*(36)धावांवर तर शाकिब अल हसन 4*(12) धावेवर नाबाद आहे.
बांगलादेशला तिसरा धक्का, शांतो पुन्हा अपयशी…
बांगलादेशला तिसरा धक्का 11.5 षटकात 45 धावांवर बसला. बांगलादेशचा डावखुरा फलंदाज नजमुल हुसेन शांतो पुन्हा अपयशी ठरला आहे. विश्वचषकाच्या या आवृत्तीतही त्याची खराब कामगिरी कायम आहे. शांतो 18 चेंडूंत नऊ धावा करून बाद झाला. त्याला पॉल व्हॅन मीकेरेनने लॉग व्हॅन बीकच्या हाती झेलबाद केले.
BREAKTHROUGH!!!!
A little sawdust does the trick, as there is a short break in play for van Meekeren to get his footmarks sorted. Bangladesh are now three down! The Netherlands are on a roll!
BAN 45/3 off 12 Overs
Trailing by 185#NEDvBAN #CWC23 pic.twitter.com/rCN3YsFhkR— Netherlands Cricket Insider (@KNCBInsider) October 28, 2023
19 धावसंख्येवर लागोपाठ दोन धक्के
बांगलादेशला 19 धावसंख्येवर लागोपाठ दोन धक्के बसले. बांगलादेशने 5.2 षटकात दुसरी विकेट आणि 4.2 षटकात पहिली विकेट गमावली. लोगान व्हॅन बीकने नेदरलँड्सला दुसरे यश मिळवून दिले. त्याने तनजीद हसनला स्कॉट एडवर्ड्सकरवी झेलबाद केले. तनजीदने 16 चेंडूत 15 धावा केल्या. तर त्याआधी आर्यन दत्त याने नेदरलँड्सला पहिले यश मिळवून दिले. लिटन दासची बॅट नेदरलँडविरुद्ध चालली नाही. पाचव्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर तो बाद झाला. आर्यन दत्तने त्याला स्कॉट एडवर्डसकरवी झेलबाद करत पॅव्हेलियनमध्ये पाठवले. लिटन दासला 12 चेंडूत केवळ तीनच धावा करता आल्या.