India vs Afghanistan World Cup 2023 :- भारतीय क्रिकेट संघ विश्वचषकातील आपला दुसरा सामना अफगाणिस्तानविरुद्ध खेळणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना 11 ऑक्टोबर (बुधवार) रोजी होणार आहे. विजयाची मालिका कायम ठेवण्यासाठी टीम इंडियाच्या नजरा असतील. पहिल्या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध विजय मिळवला होता. त्याचवेळी अफगाणिस्तानला बांगलादेशविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला. अफगाणिस्तानचा संघ भारतीय भूमीवर प्रथमच टीम इंडियाविरुद्ध एकदिवसीय सामना खेळणार आहे.
14 ऑक्टोबरला पाकिस्तानविरुद्ध होणाऱ्या मोठ्या सामन्यापूर्वी भारताला हा सामना जिंकायचा आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना होणार आहे. दुसरीकडे, अफगाणिस्तान संघाला विजयी मार्गावर परतायचे आहे. भारतानंतर 15 ऑक्टोबरला गतविजेत्या इंग्लंडशी त्याचा सामना होणार आहे.
सामना कोणत्या टीव्ही चॅनेलवर तुम्ही पाहू शकता?
वर्ल्ड कपचे सामने तुम्हाला जर फ्री मध्ये पाहायचे असतील तर ते कुठे पाहायला मिळू शकतात, ही माहिती आता समोर आली आहे. भारत विरुद्ध अफगाणिस्तान सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 2 वाजता सुरू होईल. याच्या अर्धा तास आधी म्हणजेच दुपारी दीड वाजता टॉस होईल. भारत विरुद्ध अफगाणिस्तान सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर थेट प्रक्षेपित केला जाईल. स्टार स्पोर्ट्स चॅनेलवर चाहत्यांना वेगवेगळ्या भाषांमध्ये सामन्याचा आनंद घेता येईल. डीडी फ्री डिश वापरणारे दर्शक डीडी स्पोर्ट्सवर विनामूल्य सामना पाहू शकतील.
सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग कुठे उपलब्ध असेल?
जर तुम्हाला वेब स्टाईट किंवा अॅपवर हा सामना पाहायचा असेल तर त्यासाठी Disney+Hotstar वर तुम्हाला हे सामने पाहता येतील. स्टार स्पोर्ट्स चॅनेलसाठी पैसे मोजावे लागतील. पण जर हा सामना तुम्ही मोबाईलमध्ये Disney+Hotstar वर पाहिलात तर तो तुम्हाला फ्रीमध्ये पाहायला मिळू शकतो. कारण हा सामान जर अन्यत्र ( लॅपटॉप किंवा स्मार्ट टीव्हीवर) कुठे पाहायचा असेल तर त्यासाठी पैसे मोजावे लागतील आणि सदस्यता घ्यावी लागेल. पण हा सामना त्यांच्या अॅपवर फ्रीमध्ये दाखवला जाणार आहे. त्यामुळे मोबाईलवर आता तुम्हाला फ्रीमध्ये हा सामना पाहायला मिळू शकतो. तसेच www.dainikprabhat.com वर वर्ल्ड कपशी संबंधित बातम्याही तुम्ही वाचू शकता.