अकलूज – 30 लाख रुपयांचे कस्टमचे सोने देतो असे म्हणत सातारा जिल्ह्यातील एकाने अकलूज येथील एकास 20 लाखांना फसविल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी अकलूज पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत बाबासाहेब मारुती भोळे (रा. राऊतनगर अकलूज ता. माळशिरस) यांनी फिर्याद दिली.
आरोपी विजय शिवाजी भोंडवे, जयदीप विजय भोंडवे (दोघे रा. निढळ ता. खटाव जि. सातारा) यांनी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी 20 लाख रुपयांमध्ये 30 लाखांचे कस्टम सोने देतो असे सांगितले. त्यानंतर 10 डिसेंबर 2020 ते 23 मे 2022 या कालावधीमध्ये आरोपींना रोख 16 लाख रुपये व जयदीप विजय भोंडवे यांच्या बॅंक ऑफ महाराष्ट्र शाखा पुसेगाव खात्यावर वेळोवेळी 4 लाख असे एकुण 20 लाख रुपये घेऊन फिर्यादीची फसवणूक केली. आपली फसवणुक झाल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादीने दिलेली रक्कम परत मागितली असता आरोपींनी फिर्यादींना अकलूज येथे येऊन शिवीगाळ, दमदाटी करून मारहाण केली. त्यानंतर त्यांनी पोलिसांत फिर्याद दिली. तपास सहायक पोलीस निरीक्षक वैभव मारकड करीत आहेत.