नवी दिल्ली : पाकिस्तान जागतिक स्तरावर कोणत्या ना कोणत्या कारणाने नेहमीच चर्चेत राहत असतो. त्यातच पाकिस्तानची ड्रामा इंडस्ट्री त्यांच्या कंटेंटमुळे वादात अडकल्याचे दिसते. आता अशीच एक मालिका पाकिस्तानी ड्रामा ‘मैं ऐसी क्यों हूं’ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. या मालिकेत कुरळे केस असलेल्या मुलीचे वर्णन कुरुप म्हणून करण्यात आले आहे. त्यामुळे ही मालिका सध्या चर्चेत आहे.
सोशल मीडियावर ही मालिका चर्चेचा विषय ठरली आहे. या मालिकेत अभिनेत्री नूर जफर खान आणि अभिनेता सईद जिब्रान मुख्य भूमिकेत आहे. एका नेटकऱ्याने मालिकेची एक क्लिप सोशल मीडियावर शेअर केली आहे. या क्लिपमध्ये सईद नूरला तिच्या कुरळ्या केसावर टिका करताना दिसतो. हा व्हिडीओ शेअर करत आपल्या देशात फक्त गोरा रंग कमी नव्हता, आता आपण महिलांना त्यांच्या कुरळ्या केसांवरून त्यांना ट्रोल करतो, असे कॅप्शन त्यांनी दिले आहे.
As if our national obsession with ‘fair complexion’ wasn’t enough , we are now shaming women on ‘curly hair’.
What is this content ???? pic.twitter.com/mlHFekk99z
— Absa Komal (@AbsaKomal) February 9, 2022
No this can’t be
— MEESHA SHAFI (@itsmeeshashafi) February 10, 2022
त्यावर गायिका मीशा शफीने तिची प्रतिक्रिया दिली आहे. हा व्हिडीओ शेअर करत नाही, असं कसं होऊ शकतं. तर आणखी एक नेटकरी म्हणाला, “ही स्क्रिप्ट कोणी लिहिली…, याची निर्मिती कोणी केली? हे करताना ते काय विचार करत होते…की ते हाच विचार करत होते.” दरम्यान, अशा अनेक कमेंट करत नेटकऱ्यांनी या मालिकेत दाखवण्यात आलेल्या कुरळ्या केसांवर टीका केली आहे.
दरम्यान, या व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये सईद नूरला बोलतो, ‘तुझ्या केसांमुळे तू कुरुप दिसते आणि मला कधीही कुरूप मुलीशी लग्न करायचे नव्हते. माझी फसवणूक झाली आहे. तुझी कुरूपता माझ्यापासून लपवून तू मला फसवले आहेस. ६ वर्षांपासून मला याचा पश्चाताप होत आहे आणि दुर्दैवाची गोष्ट म्हणजे माझ्या मुलीलाही हे केस तुझ्याकडून मिळाले आहेत.