Indian Premier League 2024 (Live Cricket Score, CSK vs LSG) : आयपीएल 2024 मधील 39 वा सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात खेळला जात आहे. या सामन्यात लखनौने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर प्रथम फलंदाजी करताना CSK ने 20 षटकात 4 गडी गमावून 210 धावा केल्या.
Innings Break!
Ruturaj Gaikwad leads from the front with a TON as @ChennaiIPL reach 210/4 🙌
Can #LSG chase this down?
Follow the Match ▶️ https://t.co/MWcsF5FGoc#TATAIPL | #CSKvLSG pic.twitter.com/IiOvwuWVtq
— IndianPremierLeague (@IPL) April 23, 2024
चेन्नईकडून सर्वाधिक धावा कर्णधार रुतुराज गायकवाडने केल्या, ज्याने 56 चेंडूत झंझावाती शतक झळकावले. त्याने या सामन्यात 60 चेंडूत 108 धावा केल्या, ज्यात 12 चौकार आणि 3 षटकारांचा समावेश होता. शिवम दुबेसोबतच्या त्याच्या 104 धावांच्या भागीदारीमुळे चेन्नई सुपर किंग्जला 210 धावांपर्यंत मजल मारता आली. अजिंक्य रहाणे अवघ्या 1 धावा करून बाद झाल्याने सीएसकेची सुरुवात चांगली झाली नाही. तर डॅरिल मिशेलही केवळ 11 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. 50 धावांत संघाचे 2 विकेट पडल्या होत्या. अशा स्थितीत रवींद्र जडेजानेही 19 चेंडूत 16 धावांचे योगदान दिले.
एका बाजूने विकेट पडत होत्या, पण कर्णधार गायकवाड क्रीजवर भक्कमपणे उभा होता. 12 व्या षटकात 101 धावांवर रवींद्र जडेजाच्या रूपाने संघाची तिसरी विकेट पडली. मात्र येथून शिवम दुबे आणि ऋतुराज गायकवाड यांच्या स्फोटक भागीदारीने एलएसजीच्या गोलंदाजीचे कंबरडे मोडले. दोन्ही फलंदाजांनी मिळून पुढच्या 47 चेंडूत 104 धावा केल्या. एकीकडे गायकवाडने शतक झळकावले, तर दुबेने अवघ्या 27 चेंडूत चौकार आणि षटकार लगावत 66 धावा केल्या. या झंझावाती खेळीत त्याने 3 चौकार आणि 7 षटकारही मारले. एमएस धोनी शेवटच्या चेंडूवर क्रीजवर होता, त्याला एकच चेंडू खेळता आला, त्याने चौकार मारून सीएसकेला 210 धावांपर्यंत नेले.
IPL : सुरेश रैनाने IPL चॅम्पियन न झालेल्या संघांचा केला पर्दाफाश, म्हणाला “जे संघ पार्टी करण्यावर….”
शेवटच्या 5 षटकात 75 धावा…
विशेषत: दुसऱ्या टाइमआऊटनंतर सीएसकेच्या फलंदाजांनी आक्रमक पवित्रा स्वीकारला. याच कारणामुळे चेन्नईने शेवटच्या 5 षटकात 75 धावा केल्या. दरम्यान, यश ठाकूरने 2 षटकात 35 धावा दिल्या होत्या. 19वे षटक टाकण्यासाठी आलेल्या मोहसीन खाननेही 17 धावा दिल्या, त्याच षटकात शिवम दुबेने 22 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. एलएसजीच्या गोलंदाजीबद्दल बोलायचे झाले तर केवळ मॅट हेन्री, मोहसीन खान आणि यश ठाकूर यांना प्रत्येकी 1 बळी घेता आला.