पुणे : राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व प्रकारे प्रशासन काम करत आहे. त्याच पार्शवभूमीवर शहरातील सर्व दुकाने दुकानदारांनी बंद ठेवले आहेत. मात्र याचा दुसरीकडे परिणाम होताना सध्या दिसत आहे.
विश्रांतवाडी, टिंगरेनगर येथील दुकाने बंद केल्याने महाराष्ट्र शासनाच्या दूध केंद्रावर दूध घेण्यासाठी रांग लागली होती. दरम्यान, प्रशासनाकडून वारंवार सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नका म्हणून सूचना करण्यात येत आहेत परंतु, नागरिकांनी या सूचनांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे.