शिक्रापूर -घोलपवाडी (ता. शिरूर) येथील एका घरातील तिघांसह एका मुलीला सात जणांच्या टोळक्याने बेदम मारहाण केली आहे. याबाबत सुरेखा संभाजी करचे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली.
यावरुन लक्ष्मी चौधरी, रोहिदास चौधरी, सुभाबाई चौधरी, संदीप चौधरी, सुनील चौधरी, रोहिदास यांची बहीण (नाव माहीत नाही, सर्व रा. घोलपवाडी ता. शिरूर) यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत. पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुरेश डुकले हे करीत आहेत.