आळंदी (पुणे) -महिलेच्या विनयभंगप्रकरणी पोलीस मित्र म्हणवणाऱ्या संदिप गुळवे (रा. आळंदी) यावर आळंदी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बुधवारी (दि. 7) रात्री साडेसातच्या सुमारास चऱ्होली खुर्दच्या कृष्णा आयकॉन इमारतीजवळ घटना घडली. फिर्यादी महिला कपड्याचे दुकान बंद करून दुचाकीवरून निघाली असता, आळंदीत प्रदक्षिणा मार्गावर आरोपी गुळवे याने फिर्यादी महिलेस हाक मारली. यावर आरोपीकडे दुर्लक्ष करत महिला मरकळ रोडने पुढे चऱ्होली खुर्दकडे चालली होती. तरीही आरोपीने पाठलाग केला आणि महिलेची गाडी अडवली. माझे तुझ्यावर प्रेम आहे. मला मोबाईल नंबर दे. तू माझ्या प्रेमास नकार दिला तर आत्महत्या करण्ययाची धमकीही आरोपीने दिली. दरम्यान पीडितेच्या मैत्रिणीचा मुलगा घटनास्थळी आल्याने पुढील संकट टळले. आरोपी गुळवे आळंदी पोलिसांच्या गेली दहा वर्षे संपर्कात असून पोलीसमित्र म्हणूनही तो मिरवत होता.