परभणी – हाॅस्पिटलमधील कामगाराची हत्या झाल्याची धक्कादायक घटना जिल्ह्यातील सेलु उपजिल्हा रुग्णालयाच्या आवारात मंगळवारी सकाळी घडली. विशाल सदाफळे (वय 50) असे हत्या झालेल्यांचे नाव आहे. रुपग्णालयाच्या ओपीडी गेटवरच ही हत्या झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पुढील कारवाई सुरु केली आहे.
सदाफळे हे मूळचे अमरावती जिल्ह्यातील अचलपूर येथील रहिवासी आहेत. ते सेलू येथील एका हाॅस्पिटलमध्ये काम करत होते. सकाळी डाॅक्टर रुग्णालयात येत होते. तेव्हा त्यांना ओपीडी प्रवेशद्वाराजवळच रक्ताच्या थारोल्यात पडलेली व्यक्ती दिसली. त्यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत तपास सुरु केला आहे. मयत व्यक्तीची दगडाने ठेचून हत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले. सदाफळे यांचा हत्येकरी कोण, हत्येचे कारण काय? याचा तपास पोलिस येत आहे.