पिंपरी – परवानगी नसतानाही रस्त्यावर मंडप उभारून रहदारीस अडथळा निर्माण केल्याप्रकरणी तीन जणांवर शनिवारी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
संतोष भानुदास गव्हाणे (वय 44), संजय शिवाजी नरवडे (वय 35), निलेश शिवाजी नरवडे (वय 30, तिघे रा. गव्हाणे वस्ती, भोसरी) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
याबाबत पोलीस शिपाई सुरेश नानासाहेब वाघमोडे यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपींनी नवरात्रोत्सव साजरा करण्यासाठी तसेच दुर्गा देवीची प्रतिष्ठापना करण्यासाठी संतोष अण्णा गव्हाणे स्पोटर्स क्लब मार्फत मंडपाची उभारणी केली. याबाबत तिघांवर गुन्हा दाखल करून त्यांना समजपत्र देण्यात आले आहे.