नगर – पत्नीसोबत बोलताना तरुणास मारहाण करण्यात आली. बुधवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास सर्जेपुरात रंगभवन येथे ही घटना घडली. संदीप विजय वाघमारे असे मारहाण झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात संदीप विजय वाघमारे यांच्या फिर्यादीवरुन दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.