तबलिगीमधून परतलेल्या १५० जणांविरुद्ध गुन्हा 

मुंबई : दिल्लीच्या तबलिगी कार्यक्रमातून आलेल्या १५० जणांविरुद्ध मुंबई महानगर पालिकेने आझाद मैदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. मात्र ५० पैकी फक्त १० जनाची ओळख पटवण्यात आली आहे. त्यातील ४० जणांचा अजूनही शोध सुरूच आहे.

दरम्यान राज्यात मंगळवारी २३ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यातील सर्वाधिक १० रुग्ण मुंबईत आढळले आहेत. पिंपरी-चिंचवड ४, अहमदनगर ३, सांगली १, बुलढाणा २, ठाणे १ आणि नागपूर २ अशी कोरोनाबाधितांची आकडेवारी आहे. राज्यात एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ८९१ वर पोहचला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.