पुणे-पुण्यातील घोरपडी येथे रेल्वेकडून ‘आयसोलेशन वार्ड’ तयार करण्याचं काम सुरू आहे. पहिल्या टप्प्यात एकूण 50 कोच तयार केले जाणार आहे त्यातील 14 कोच तयार झाले आहेत. हे कोच येत्या दोन दिवसात प्रशासनाला उपलब्ध होणार आहे.
एक बोगीत किमान 16-18 रुग्ण राहतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे. पुणे विभागामार्फत 50 कोच पुरवण्यात येतील त्यात 800 ते 900 रुग्ण राहील अशी व्यवस्था आहे.
एका बोगीला 4 टॉयलेट असतात त्यातील 1एकाच बाथरूम मध्ये रूपांतर करण्यात आले आहेत. शिवाय ऑक्सिजन, बेड, ब्लॅंकेट अशा अनेक सुविधा रेल्वेकडून पुरवण्यात येणार आहेत.