नवी दिल्ली – क्राफ्टस्मन ऑटोमेशन या वाहनांचे सुटे भाग तयार करणाऱ्या कंपनीच्या प्रार्थमिक समभागांची विक्री 15 मार्च पासून सुरु होणार आहे.
यासाठी कंपनीने शेअरची किंमत 1488 ते 1,490 रुपये प्रति शेअर इतकी निश्चित केली आहे. 17 मार्चपर्यंत गुंतवणूकदारांना यासाठी बोली लावता येणार आहेत. या माध्यमातून कंपनीने 150 कोटी रुपये उभे करण्याचे ठरविले आहे.
लक्ष्मी ऑर्गानिक –
लक्ष्मी ऑर्गानिक या कंपनीचा आयपीओही 15 मार्च पासून उपलब्ध होणार असून कंपनीने यासाठीच्या शेअरची किंमत 129 ते 130 रुपये ठेवली आहे. त्या माध्यमातून कंपनी 600 कोटी रुपये उभे करणार आहे.