नवी दिल्ली – सरन्यायाधीश एन.व्ही.रमण्णा यांच्या अध्यक्षतेखालील सर्वोच्च न्यायालयाच्या कोलेजियमने 5 न्यायाधीशांच्या बढतीची शिफारस केली आहे. या पाच न्यायाधीशांना वेगवेगळ्या उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी बढती देण्यात यावी, अशी शिफारस या कोलेजियमने केली आहे. आज झालेल्या कोलेजियमच्या बैठकीमध्ये याबाबतचा निर्णय घेण्यात आला. याबाबतचा ठराव सर्वोच्च न्यायालयाच्या संकेतस्थळावर देखील प्रसिद्ध करण्यात आला आहे.
या शिफारसीनुसार दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश असलेल्या विपीन संघी यांना उत्तराखंड उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश, मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश अमजद ए सय्यद यांना हिमाचल प्रदेशच्या उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश, मुंबई उच्च न्यायालयातील न्यायाधीश एस.एस. शिंदे यांना राजस्थान उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश, गुजरात उच्च न्यायालयाचे न्यायाधीश रश्मी एम. छाया यांना गोवाहटी उच्च न्यायालयाचे मुख्या न्यायाधीश आणि तेलंगण उच्च न्यायालयातील न्यायाधीश उज्जल भुयन यांना तेलंगण उच्च न्यायालयातच बढती देऊन मुख्य न्यायाधीश केले जाणार आहे.
याशिवाय, तेलंगणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश सतीश चंद्र शर्मा यांची दिल्ली उच्च न्यायालयात बदली करण्याची शिफारसही कोलेजियमने केली आहे.